Thursday, November 6, 2008

माझापण ब्लॉग!

ब्लॉग लिहिण्याचा विचार मी गेल्या ५ वर्षांपासुन करत होतो, मुहुर्त आज लगला, आणि आपण सर्व एकाच मळेचे मणि असणार ह्यातहि मला जस्त शंका नाही. नाव फारच सुन्दर बनवलेस बरका संदिप्, मला एकदम मझ्या T.E. च्या mini project ची आठवण झाली. कधि एक lecture न करन्यासाठि प्रसिद्ध असलेल्या आम्हि ३ मित्रानि मिळुन Windows Desktop Simulation केले होते c मद्धे. it was a huge miniproject actualy, nearly 12000 LOC. मग तो क्लासमध्दे काहिसा famous झल्यावर आम्हि आमच्या group ला नाव दयायचे ठरवले. Windows start होताना जसे Microsft नाव येते ना तसे :-). झाले, launch (class demo) च्या दिवशि सर्व class समोर demo सुरु झाला.मी start.exe run केली आणि screen वर animation सुरु झाले .... 'Amol' cha 'A' येतो आणि खालि पडतो, 'Ketan' चा 'K' येतो आणि खालि पडतो, Sudarshan चा 'S' येतो आणि खालि पडतो. मग खालि पडलेल्या letters चे Dhoom title सारखे screen वरुन पळत जातात् - 'AKSsoft Presents - Windows 2020 :-). त्यात कहर म्हणजे background ला sound() अणि nosound() use करुन बनवलेले कर्कश ambulance चे music पण टाकले होते (आमचे Windows next generation आहे हे दाखविण्यसाठि :-) ). क्लासमधले सर्व (कदाचित कुत्सिपणे) हसले, आणि आम्हि तिघे एकमेकांकडे बघत मनात म्हणालो, "next time थोडा simple start देउ. :-).

- केतन

No comments: