Thursday, November 6, 2008

धुरकट अंत

आणि तो शेवट मा़झ्या समोर ठाकला. ऐन तारुण्यामद्धे जाणारयांसाठी लोकांच्या मनात थोडे जस्तच दु:ख असते, पण मी गेल्यानंतर माझ्यासाठी तसे कुणाला वाटणार नाही अशी सोयच मी करुन जातोय. उगीच आयुष्यभर दुखात काढणार नाहित माझे आई-वडील. सिनेमांमद्धे बरयाचदा ऐकले होते, मरताना संपुर्ण आयुष्य डोळ्यासमोरुन एखाद्या चलचित्राप्रमाणे निघुन जाते. मलाहि आठवत होते बरेच काही, जे एखाद्या नोर्मल माणसाला आठवते ते, पण त्या चलचित्राचा सेकण्ड हाफ एकिवरच फोकस झाला होता. हो, 'ति'च्यावर...

असे म्हणतात की सर्व दु:ख देणारया गोष्टिंचा विचार करताना त्यांची सुरुवात कितिहि जुनी असली तरी आठवतेच. मला आजही आठवतो तो दिवस जेन्व्हा मी पहिल्यांदा तिला पाहिले. तसे १२ वी पर्यंत त्या होत्याच अवतिभवति, पण आम्हाला घरुन सक्त ताकिद हो कि त्यांच्यापसुन लांब रहावे. अगदि शाळेत असल्यापासुन त्यांच्याशी संबंध नाहि. मित्रच एवढे होते कि गरजच वाटली नाही कधी. पण मग मात्र सर्वच बदलले. बाकी सर्व मुले, जी 'त्यां'च्यासोबत कायम दिसायची, अगदी आनंदी, समाधानी, आयुष्याचि खरी मजा अनुभवणारे, त्याना बघुन वाटु लागले कि आपण का नाही? आणि तो दिवस आला. माझा मित्र नसलेल्या एका मित्राच्या मित्राने ओळख घालुन दिली. खुपच खुपच गोंधळुन गेलो होतो, आपोआप शरिर कहितरि विचित्र चळे करु लागले, ह्र्दयातली धडधड वाढली होती, डोळेतर वर बघतच नव्हते, मग इकडेतिकडे बघुन, खोकुन्, आलेले टेंशन दुर करण्याचा प्रयत्न सुरु. पण काहीही म्हणा, ती भेट स्पेशलच होती. पहील्याच भेटीत मी तिचा झालो.

म्हणतात ना हिन्दी मद्धे, "शमा जब जलति है तो, जलने के लिये आता है परवाना".. आम्ही रोज भेटु लागलो, सुरुवातिला ४ दिवसांतुन एकदा, मग दिवसातुन चारदा. तिच्याविना जगणे अवघड होऊ लागले. खाणे, पिणे, लेक्चर्स्, अभ्यास, सर्वच विसरलो. माझ्याप्रमाणेच ज्यांच्यासोबत त्यांची 'ती' आहे, अश्या सर्वांचा एक ग्रुप बनला. ज्यांच्याकडे 'ती' नाहि, त्यांच्यापासुन आपोआपच दुर गेलो. मग एकत्र सर्वांच्या पार्टीज, एन्जॉयमेण्ट्, ट्रीप्स, पण त्या सर्वांमद्धे आम्ही एकमेकाना कधिच विसरलो नाहि. कायम साथ देण्याचे जणु वचनच घेतले होते. दिवस खुप आनंदात जात होते.

शिक्षण संपले, नोकरी सुरु झाली, जबाबदारया वाढु लागल्या. ती कायम सोबत होती. पण या जगात सर्व काही विनाशकारी असते असे म्हणतात, माझ्या आणि तिच्या प्रेमाला ग्रहण लागले. मध्यंतरात एक ऑफिस कुलिग माझ्या जवळ आली. तिच्या सौंदर्य, तिचे हसणे, लाडाने बोलणे सर्व गोश्टिंचा मी फॅन बनलो. मग तिची आणि हिची तुलना होऊ लागली मनात्. शेवटी व्हायचे ते झाले. मी तीला सोडले. माझे नविन साथिदारासोबत नविन प्रेमाचे दिवस सुरु झाले. आमचे सर्व विचार्,आवडी, स्वभाव तंतोतंत जुळायचे. 'ती'ची आठवण कधि आलीच नाही, असे वाटले कि आयुष्याचा सोनेरि काळ सुरु आहे माझा. पण तो काळ सोन्यासारखाच दुर्मिळ आणि अवाक्यात नाही एवढा माहाग होता. ३ महिन्यातच संपला आणि मी एकटा पडलो.

नाही म्हणुन म्हणुन मे पुष्कळ प्रयत्न केला, पण पुन्हा 'ती' मला आठवु लागली. तिच्यासोबत घालविलेले एक एक क्षण डोक्यात घुमु लागले. आणि ते क्षण त्या क्षणभंगुर प्रेमापेक्षा किती सुंदर होते हे मनाला पटु लागले. मग एक दिवस हिम्मत करुन तिला सर्व सांगुन टाकले आणि आश्चर्य म्हणजे तिने ते सर्व मान्य करुन मला जवळ घेतले. तिच्या कुशित मग नको तेवढे रडलो. माझ्या ह्या जुन्या साथीदारावर आणखिच प्रेम करु लागलो. म्हणता म्हणता १० वर्षे ऊलटुन गेली. मी तिची साथ सोडली नाही आणि तिनेही माझी. माझे सर्वांस्व व्यापुन टाकले तीने. तीन महीन्याचा दुरावा आम्हाला जास्तच जवळ घेऊन आला. आणि...... एका रम्य सकाळी, मला तिने हॉस्पिटलमद्धे अडमिट केले.


हो आजचा दिवस तो हाच्. अर्धे आयुष्य माझ्या सोबत असणारि असे काहि करेल, असे स्वप्नातहि वाटले नव्हते. पण तिने ते केले... आणखि लाखो लोकांसोबतहि 'ती'ने हेच केले... डॉक्टर आताच गेले, जाताना म्हणाले, 'ती'ने तुझ्या ह्रदयावर नाहि, तुझ्या फुफ्फुसावर घाव केलेत...

- केतन

No comments: